*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी*
देवणी :-
तालुक्यातील लासोना ग्रामपंचायतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच धनराज मठपती तर प्रमुख अतिथी उपसरपंच अंकुश माने उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
उपसरपंच अंकुश माने यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. गावच्या योगदानासाठी भरीव कामगिरी केल्यामुळे त्रिशला माने व सुरेखा कुलकर्णी या महिलांना अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासह सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी ग्रामसेवक कुंटे, तलाठी कुकर तसेच चेअरमन सुभाष मुळे, माजी ग्रा.पं.सदस्य श्रीकृष्ण कुंटे, उद्योजक विष्णू इंचुरे, पत्रकार बालाजी मरळे, अनुसया मोरे, कविता फावडे, अनिल टिळे, सुशांत म्हेत्रे, किशोर माने, अंगणवाडीताई, आशा-कार्यकर्ता यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments