मंगेशकर महाविद्यालयाच्या ज्ञानेश्वर पाटील यांना खेलो इंडिया कुस्ती स्पर्धेत कांंस्यपदक
निलंगा:-
औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील बी.ए.प्रथम वर्षातील ज्ञानेश्वर कृष्णात पाटील या खेळाडूने दि.२५ मे - ०३ जून २०२३ या कालावधीत बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचे प्रतिनिधित्व करत दि.२९ मे रोजी संपन्न झालेल्या ५५ किलो वजन गटातील ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले. प्रस्तुत क्रीडा यशाबद्दल ज्ञानेश्वर पाटील यांचे शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, उपाध्यक्ष प्रेमचंद बियाणी, सचिव रमेश बगदुरे, उपसचिव राजेश वलांडे, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, प्रा.मुश्ताक रक्साळे, महाविद्यालयातील क्रीडा समिती, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वर पाटील यांना महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विजयकुमार हंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments