Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त शिबिराचे नियोजन*




*महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त शिबिराचे नियोजन*   
       
    निलंगा:-           

दि.17/05/2023 रोजी, गाव दापका गुडोंपन ता.मुखेड जि. नांदेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त मोफत मधुमेह, रक्तदाब,नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. 
                 या शिबिरामध्ये डॉ. बालाजी झटकोटे,डॉ.श्रीनिवास गव्हाणे, बालाजी सोलापुरे,डॉ.ओम चिट्ठे, डॉ.प्रशांत नवटके उद्घाटक म्हणून उपस्थित होते. हे शिबीर उदयगिरीलॉन्स नेत्र रुग्णालय व मधुर डायबिटीज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.या शिबिरांचे नियोजन काही दिवसापूर्वी करण्यात आले होते पण गारपीठामुळे व पावसामुळे होऊ शकले नव्हते.
                या शिबिरांचे नियोजन व्यंकटराव पाटील दापेकर,  राजप्पा चिट्ठे,सुभाष दापकेकर यांनी केले होते.  या शिबिरामध्ये एकूण 222 लोकांची मधुमेहांची व रक्तदाबाची करण्यात आली.यामध्ये 71 मधुमेही तर 84 रक्तदाबाची रुग्ण आढळून आले.मधुमेहांची व रक्तदाबाची चाचणी सुनील जाधव, नवीन श्रृंगारे, महेश ढगे यांनी केली.

Post a Comment

0 Comments