सिद्धरामय्यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची तर डीके शिवकुमारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
कर्नाटक
काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांमधील नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
दरम्यान, सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर या शपथविधी सोहळ्यात अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे

Post a Comment
0 Comments