*पीक कर्जाचा लाभ घ्यावा- शाखाअधिकारी अक्षय खवास*
निलंगा:
जूनच्या खरीप हंगामात सोयाबीन, ऊस व इतर पिकावर शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज घ्यावे असे मत नणंद येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक मेळाव्याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाव्यवस्थापक अक्षय खवास यांनी आपले मत मांडले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने मौजे. नणंद येथे ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक अक्षय खवास यांनी याप्रसंगी खरीप हंगामातील सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 57 हजार रुपये पीक कर्ज, उसावर हेक्टरी एक लाख रुपये पिक कर्ज मिळेल व बँकेच्या विविध योजना विषयी ग्रामस्थांना माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, सरपंच हरिदास बोळे, सोसायटीचे सदस्य विश्वनाथ बेलकुंदे, माजी चेअरमन नामदेव मेत्रे उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील मोहन पाटील, राम मिरगाळे,राजाराम घाडगे, सुनील धोंडदेव, वसंत मेहत्रे, विजयकुमार पाटील, शिवाजी बोधले, माधवराव पाटील, संतोष स्वामी, दत्तू लादे, राम लादे, कालिदास पाटील व अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments