Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*गाळमुक्त धरण योजनांसाठी 'बीजेएस' ची जनजागृती मोहीम*


गाळमुक्त धरण योजनांसाठी  ' बीजेएस ' ची जनजागृती मोहीम 

लातूर  ;

देशातील टंचाईग्रस्त जिल्ह्यांना जलसमृद्ध बनविण्यासाठी केंद्र राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने आणि भारतीय जनता संघटनेच्या सहकार्याने मिशन जलपर्याप्त जिल्हे ही योजना राबविण्यात येत आहे . या योजनेच्या जनजागृतीसाठी  'बीजेएस ' गावागावांमध्ये जनजागृती करीत आहे. 
            यासाठी मिशन जलपर्याप्त जिल्हे ही योजना राबविली जात आहे. या योजनेतर्गत भारतीय जैन संघटनेच्या ( बीजेएस ) वतीने लातूर जिल्ह्यातील गावा गावांमध्ये जाऊन सरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी एक प्रचार रथ तयार करण्यात आला असून या रथाचे अनावरण नुकतेच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी .यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
        या प्रचार रथावर सर्व प्रचार साहित्य तसेच कार्यक्रमाचे गाणे , जिंगल , घोषणा आणि संवाद जनजागृतीसाठी तयार करण्यात आले आहे. हा प्रचार रथ गावागावात जाऊन या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करीत आहे , अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभय शहा यांनी दिली. 
       गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना यंत्रसामुग्री आणि इंधन या दोन्हीचा खर्च देण्यात येणार आहे . तसेच अल्प व अत्यल्प भूधारक  , विधवा , अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी अनुदान देण्यात येणार आहे . अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि इंधन याकरिता 31 रुपये प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35.75 रुपये प्रति घनमीटर प्रमाणे एकरी 15000 रुपयांच्या मर्यादेत व 2.५ एकर  (37 हजार पाचशे रुपये ) पर्यंत अनुदान दिले जाणार आहे .
महाराष्ट्र शासनामार्फत ' जलयुक्त शिवार २ ' तसेच केंद्र शासनांमार्फत जलजीवन मिशन या योजनांच्या माध्यमातून पाणी संकटावर मात करता येऊ शकते यासाठी ग्रामपंचायतींना व पाणी समित्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन सक्षम केल्यास गावातील सर्व तलावांचा गाळ प्रशासनाच्या माध्यमाने काढला जाऊ शकतो व निगा राखण्याचे कायमस्वरूपाचे काम केले जाऊ शकते.ज्या ग्रामपंचायती आपले गाव जल आत्मनिर्भर करण्यासाठीची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असतील अशा ग्रामपंचायतीकडून मागणी अर्ज मागविण्यात येत आहेत. लगेत  प्रचार रथ  ते गावात पाठवुन   लोकाना  माहीती  करणेत  येनार आहे लातूर , रेणापूर ,औसा, निलंगा ,लातुर ग्रामीन  तालुक्यातील ग्रामपंचायतींनी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी अशोक वणवे  (9420388202) यांच्याशी संपर्क साधावा व अहमदपुर  चाकुर , ऊदगीर , देवणी . जळकोट या तालुका साठी    प्रतिनिधी   नवनाथ   दहीफळे  ७०५८९८ ४३५९ याच्या  शी   सपॅक करावा तिकडे  प्रचार  रथ  पाठविला  जाईलअसे आवाहन बीजेएससचे जिल्हाध्यक्ष अभय शहा , सुनील कोचेटा , किशोर जैन ,संतोष उमाटे, डॉ. पी.पी. शहा, पंकज जयस्वाल ,अजय शहा ,राजू सुराणा आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments