*श्री षण्मुखेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना केले अनोख्या पद्धतीने अभिवादन*
मुख्य संपादक शिवाजी निरमनाळे
9890098685
निलंगा -
महाराष्ट्र राज्य सरकारने 6मे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्याचा आदेश शाळेचा देण्यात आला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्रात, लातूर जिल्ह्यात 6 मे हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ सर्व शाळेमध्ये साजरा करण्यात आले.
श्री षण्मुखेश्वर विद्यालय तांबाळा ता निलंगा जि लातूर येथील इयत्ता सहावीत अध्ययन करणारा चि योगेश लक्ष्मण ब्रम्हावाले या विद्यार्थ्यांने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्ततेनिमित्त छत्रपती शाहू महाराजांचे रेखाचित्र काढून अनोख्या पद्धतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. शाळेत चित्रकला या विषयाचे शिक्षक उपलब्ध नसतानाही त्यांनी स्वतः हे रेखाचित्र काढले आहे. शिक्षकांच्या मदतीशिवाय चि. योगेश लक्ष्मण ब्रम्हावाले यांनी हे चित्र काढल्याबद्दल श्री षण्मुखेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ उडबळे सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Post a Comment
0 Comments