मी औरादकर यांच्या रास्ता रोकोस छावासह अनेक गावांचा पाठींबा.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता इंगळे व शिंदे डेवलपर्स चे कर्मचारी कसबे यांनी लवकरच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे
मुख्य संपादक:- शिवाजी निरमनाळे
9890098685
औराद शहाजानी :-
येथील राष्ट्रीय महामार्ग असलेल्या लातूर-जहीराबाद मार्गावर शेळगी मोडवरील खोदकाम करुन जिवघेण्या बनलेल्या त्या कच्च्या पुलाच्या ठिकाणी पक्का पुलाचे बांधकामासाठी करण्यात येणाऱ्या रास्ता रोकोला अखिल भारतीय छावा संघटनेसह शेळगी , तगरखेडा व औराद ग्रामपंचायत कार्यालयांनी लेखी पाठिंबा देत गावातील बहुसंख्य लोकांनी सहभाग नोंदविला.
येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२/के वरील शेळगी मोड येथे पूल बांधण्यासाठी मोठा खड्डा करण्यात आला होता. तो बांधकामाचा विषय विवादित असल्याने पाठीमागील साधारणतः तीन वर्षापासून हे काम रेंगाळलेले होते. सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने प्रकरण निकाली काढून साधारणतः दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे.सदर ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. पण संबंधित शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ते बांधकाम करण्यास टाळाटाळ करत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ही यामध्ये लक्ष घालत नाही. म्हणुन याविषयी ग्रामस्थांनी दिनांक ८ मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान रास्ता रोको करण्याचे लेखी निवेदन देऊन ठरवले होते. या आंदोलनाला औराद परीसरातील नागरिक व प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने अखिल भारतीय छवा संघटनेच्या वतीने व शेळगी , तगरखेडा व औराद ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनेही रास्ता रोको आंदोलनास लेखी पाठिंबा दिला तसेच शेळगी तगरखेडा औराद येथील लोकांनी या वेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे अनेक पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभागी होत आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.
या आंदोलनादरम्यान गावातील पत्रकार दिपक थेटे , छावाचे भगवान माकणे, पाटील , कन्हैया पाटील , काँग्रेसचे अभय साळुंके, व्यापारी महासंघाचे राजा पाटील यांनी या पुलाच्या ठिकाणी घडलेल्या अपघातांची माहीती देत येथे लवकरच नविन पक्क्या पुलाची गरज व चांगल्या दर्जाच्या रस्त्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांना बोलुन दाखवले त्याप्रमाणे आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता इंगळे व शिंदे डेवलपर्स चे कर्मचारी कसबे यांनी लवकरच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संबंधित रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
या रास्तारोको आंदोलनाला चिघळवु न देता येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे यांनी आंदोलक व संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांचे योग्य समन्वय घडवुन आनले व औरादकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या जिवघेण्या पुलाचे बांधकाम व रस्ता दुरुस्ती करणे लवकर करण्यासाठी त्यांनीही महत्वाची भुमिका घेतली व शांततेत आंदोलन यशस्वीपणे पार पडले.
यावेळी दिपक थेटे, अमोल ढोरसिंगे, दत्ता कांबळे, अनिल कांबळे, कन्हैया पाटील, अंकुश भंडारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजा पाटील, सतीश देवणे , राजाप्पा वलांडे, छावाचे राज्य सल्लागार भगवान माकणे, शेळगी चे सरपंच बंकट बिरादार, तगरखेडा उपसरपंच मदन बिरादार, सुधाकर शेटगार, विद्यासागर पाटील व बहुसंख्य नागरीकांची उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments