Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*कडबाकुट्टी सयंत्र, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकनयंत्र मिळणार अनुदानावर,15 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

कडबाकुट्टी सयंत्र, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकनयंत्र मिळणार अनुदानावर, 15 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर:

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कडबाकुट्टी सयंत्र, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकणयंत्र अनुदानावर डीबीटी तत्वावर देण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांना प्राधान्य राहील. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबारा,आठ अ, आधार कार्ड,बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, लाभार्थी अनुसुचित जाती,  अनुसूचित जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतीसह तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाकडे 15 मे 2023 पर्यंत अर्ज करावेत.

लाभार्थीची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्याबाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल. खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करुन बी.आय.एस. अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणपत्रानुसार तांत्रिक निकषानुसार असावीत. औजारासाठी जास्तीचे अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड संबंधित पंचायत समितीस्तरावर करण्यात येईल. मंजूर औजाराचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डी.बी.टी. प्रणालीव्दारे अदा करण्यात येईल. 

इच्छुक शेतकऱ्यांनी दिनांक 15 मे, 2023 पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे परिपुर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन कृषि विकास अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, लातूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments