Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*धोकेबाज भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करून काम करावे- संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण*


*धोकेबाज भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करून काम करावे- संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण*

अहमदपूर :

 येथे लातूर ग्रामीण जिल्हा ग्रामीण क्षेत्रातील उदगीर,चाकुर,अहमदपूर,लातूर ग्रामीण,जळकोट तालुक्यातील शिवसैनिक यांचा मेळावा व नूतन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व नूतन लातूर जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण साहेब यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना लातूर जिल्हा नूतन शिवसेना संपर्क प्रमुख तथा लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन शिवसैनिकांनी काम करावे, शिंदे, मिंदे, शरमींदे यांनी जेल मध्ये जाणार या भीती पोटी जन्म दिलेल्या मातेसी गद्दारी केली आहे.भाजपा सोबत जाऊन त्यांनी स्वतःच राजकीय आत्महत्या करून घेतली आहे.भाजपा हे स्लो पॉइजन आहे,ते त्यांनी विश पिल आहे.काही दिवसात याचा परिणाम त्यांना दिसून येईल तेंव्हा गद्दारांना कवडीची किंमत उरणार नाही. भाजपने सत्तेवर येण्यासाठीच पुलवामा हल्ला घडवून आणला आणि वीर जवानांचा बळी घेतला आहे.सत्तेसाठी भाजप लोकशाही पायदळी तुडवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात व हिंदुस्थानात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी गद्दार मिंदे गट व भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करून काम करावे असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.मेळाव्याचे संयोजक  शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी होते. 
मान्यवरांचे हस्ते नूतन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. संतोष रोडगे सर,नंदकुमार पवार, मुक्तेश्वर पाटील,माधव पवार, दत्ता कलाले, किशन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
लातूर जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी यांचा आज अभिष्टचिंतन दिवस त्या निमित्ताने संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण साहेब यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्यातील तमाम आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास लातूर जिल्हा महिला संघटक सौ. सूनीताताई चाळक, जिल्हा संघटक गजानन होनराव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी लक्ष्मण पेटकर,माजी जिल्हाप्रमुख नामदेव मामा चाळक, शैलेश वडगावे,उपजिल्हाप्रमुख बी. एन. डोंगरे,नंदकुमार पवार,भारत सांगवीकर, तालुका प्रमुख  दिलीप पाटील,कैलास पाटील, विलास पवार हांगरगेकर, मन्मथ बोधले, हारी साबदे, नगरसेवक संदीप चौधरी, शिवलिंग धुळशेट्टे, गजेंद्र किडे, नांदेड उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, नगरसेवक, चव्हाण,वाघमारे, विधानसभा संघटक श्रीमंत सोनाळे, माजी तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,युवा सेनेचे श्रीनिवास नरहारे, उपेंद्र काळेगोरे , रमन माने,चंद्रकांत सांगळे,  उपतालुकाप्रमुख अनिकेत फुलारी, संतोष अदठराव, लहू बारवाड,तिरुपती पाटील, दत्ता हेंगने, शिवाजी गडकर,सतीश जाधव,दत्ता नरवडे,,शहर प्रमुख शिवा कासले, शंकर सोप्पा, उपशहर प्रमुख शिवा भारती, शिवकुमार बेद्रे,सुभाष गुंडीले, पद्माकर पेंढारकर, शिवा निडवदे, संजय बुरुसपट्टे , विनोद वाघमारे,गणेश चव्हाण, माऊली देवकत्ते, दत्ता सोळंके,शुभम गोरटे, बसवेश्वर शिलगीरे, गजानन येणे, बालाजी पडीले, सुरेश अंकुलगे , कृष्णा रोकडे,मनोज चामे, सोमनाथ आढाव, जितेंद्र पवार,श्रीराम कदम, दत्ता सोळंके, अजय सुरनर, मारुती बिराडे, मारुती आरदवाड , ऋषिकेश खोमणे, रवि राचमाळे व्यंकट सुरकुटे बबन फुलमटे , रवी चामवाड, सुधाकर बालवाड , संतोष सूर्यवंशी , विठ्ठल मंगे,बालासाहेब मंगे, गंगाधर कल्याणी, पवन उर्फ बापूराव देऊळकर महेश पाटील, सुरनर, धनंजय तुडमे विक्रांत पारगे शुभम गोरटे ,यांच्यासह लातूर ग्रामीण जिल्हा क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
 यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सुनीताताई चाळक, लक्ष्मण पेटकर, बी.एन डोंगरे,श्रीमंत सोनाळे, संतोष रोडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिकेत फुलारी यांनी तर सूत्रसंचलन गणेश माने यांनी केले.

Post a Comment

0 Comments