राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी तर्फे अभिवादन..!
मुख्य संपादक :-शिवाजी निरमनाळे
9890098685
लातूर -
आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना स्मृती दिनानिमित्त छ.शाहु चौक लातूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील,मुर्तुझा खान, नवनाथ आल्टे,ऍड.निशांत वाघमारे,लाला सुरवसे,ऍड.गंगणे,जाकीर तांबोळी,सोहम गायकवाड,प्रविणसिंह थोरात,जमीर शेख,परवेझ सय्यद, राष्ट्रवादी अर्बन व आयटी सेल शहरजिल्हाध्यक्ष डी.उमाकांत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्ष सांगता दिन आहे.छ.शाहु महाराज यांचा पुतळा गेल्या काही वर्षांपासून अनावरण करण्यावाचून बंदिस्त आहे.पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने वारंवार आवाज उठवून ही लातूर शहर महानगरपालिकेने गेंड्याची कातडी पांघरलेली असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत 1 मे 2023 पुर्वी लातूर पालिकेचे आयुक्त यांनी तोंडी आश्वासन दिले होते.परंतु आज स्मृति शताब्दी सांगता दिन असूनही लातूर शहर महानगरपालिकेने छ.शाहु महाराज चौक येथिल पुतळ्या परिसरात अभिवादन करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतीही तसदी घेतली नाही.याचा लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून सोमवारी राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाला देण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments