*निलंगा तालुक्यात डीसीपी अकॅडमी नंबर वन*
*MH-CET 2023 मध्ये डीसीपी अकॅडमी निलंगा येथून ऋषिकेश माळेगावे 99.23%(PCM) तर प्रणवी काळे 99.16% (PCB) गुण घेऊन तालुक्यात प्रथम. 30 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह पात्र.*
निलंगा:-
महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी MH- CET 2023 मध्ये निलंगा येथील डीसीपी अकॅडमी चा ऋषिकेश माळेगावे 99.23 % पीसीएम ग्रुप मधून तर प्रणवी काळे 99.16% पीसीबी ग्रुप मधून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
अकॅडमीच्या एकूण दहा विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेतले आहेत. ओंकार रंडाळे 98.60, संध्या माडगे 97.31, स्नेहल सातपुते 96.84(PCM), ऐश्वर्या भोसले 96.17, स्नेहल सातपुते 96.7(PCB), आरती सातपुते 93.67, समृद्धी माने 93.29, ओंकार कुलकर्णी 93.21, हर्षल सुरवसे 88.99, श्वेता हाडोळे 88, सरस्वती बिरादार 87.89, ओम दादगे 86.16, शुभांगी सूर्यवंशी 86, सानिया पटेल 83.38, आशिष ढोरसिंगे 83.37, सार्थक देवनगेरे 83.37, धरती गट्टे 82.86, वैष्णवी बिरादार 82.86, सुप्रिया जाधव 81.23, शिवशंकर मुळे 81.19, सुयश डबरे 80 पर्सेंटाइल प्राप्त करून घवघवीत यश मिळवले.
सर्व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अकॅडमीचे संचालक प्रा विजय डावरगावे सर व प्रा पुरुषोत्तम डावरगावे सर यांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अतिशय कमी कालावधीतच डीसीपी अकॅडमीच्या तज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या टीमने अतुलनीय कामगिरी करून दाखवली याबद्दल सर्व शिक्षकांचे देखील अभिनंदन केले. "आजच्या काळात अगदी सातवी आठवी वर्गापासून शालेय अभ्यासक्रमासोबतच सर्व प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ची तयारी करणे आवश्यक झाले आहे. याच अनुषंगाने डीसीपी अकॅडमी येथे संपूर्ण JEE व NEET फाउंडेशन कोर्स दिला जात आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला तर निश्चितच आपले विद्यार्थी महाराष्ट्र व देशभरातून अव्वल येतील " असे मत विजय सरांनी व्यक्त केले.


Post a Comment
0 Comments