शिवराज्याभिषेक सोहळ्याला उत्साहात सुरुवात
औराद शहाजानी:
येथील नागरिकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिषेक करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक उत्साहात साजरा करण्यासाठी समस्त औरादकरांनी दि.२ जून ते ६ जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे तिथीनुसार शुक्रवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपत्नीक माजी मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिषेक करण्यात आला. यावेळी औरादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे, माजी पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे, उपसरपंच महेश भंडारे, औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार उपसभापती शाहुराज थेटे बालाजी भंडारे, रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह किशोर पोतदार, डॉ.ज्ञानेश्वर कदम, डॉ.मल्लिकार्जून शंकद, राजेंद्र माेरे, बाजार समिती संचालक निर्भय पिचारे, सतिश देवणे, संजय दाेरवे, राम काळगे, कालिदास रेड्डी, अर्चना गाैडंगावे, शाहुराज पाटील, सुरेश बिरादार, भरत बियाणी, जगन्नाथ बिरनाळे, पद्मसिंह पाटील, कन्हैया पाटील, श्रीराम बियाणी, धाेंडीराम कदम, सुरेश पाटील, अशाेक थेटे, संताेष लांडगे आदी मान्यवर, व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने ३ जून रोजी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जून रोजी रक्तदान व ५ जून रोजी गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच या सोहळ्याचा समारोप ६ जून रोजी शिवव्याख्याते गजानन बनबरे व गोरक्षनाथ आबुज यांच्या व्याख्यानाने होणार आहे.

Post a Comment
0 Comments