योग साधना शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न
औराद शहाजनी
महर्षी दयानंद सरस्वतींच्या २०० व्या जन्म वर्षा निमित्त पतंजली योग समिती, आर्य समाज, माहेश्वरी प्रगती मंडळ व समस्त औरादकरांच्या वतीने योग साधना शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
औराद येथील माजी मुख्याध्यापक प्रेम सोनी, व्यापारी भरत बियाणी, आदर्श व्यास, एम.आर. बिरादार, योगाचार्य तातेरावजी सावरे, डॉ. प्रकाशसिंह कच्छवा, सौ वैशाली हाणेगावे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मराठवाड्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती स्व. प्रेमचंद बियाणी यांच्या दुःखद निधनाबद्दल उपस्थित औरादकरांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सतीश हाणेगावे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर योगाचार्य तातेराव सावरे गुरुजी यांनी यम, नियम, आसन, योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा या संदर्भातील वैज्ञानिक शास्त्रीय माहिती देत प्रात्यक्षिके करून दाखविले.
या पहिल्याच दिवशी ५२ स्त्री-पुरुषासह योग साधकांचा सहभाग लाभला. महिलांच्या आसनाची विशेष वेगळी व्यवस्था शिबिरात करण्यात आलेली होती. २१ जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विशेष पूर्व तयारी करण्यात येत असल्याचे डॉ. प्रकाशसिंह कच्छवा यांनी सांगितले. हे शिबिर १९ जून ते २५ जून पर्यंत सातत्याने चालू असणार आहे, याची सर्व गावकऱ्यांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले.

Post a Comment
0 Comments