“समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न व्हावेत”.
भिक्खू पय्यानंद थेरो.
लातूर
प्रत्येक समाजात अनादी काळापासून रूढी, परंपरा, रीती रिवाज पाळल्या जातात. सर्वच रूढी, परंपरा रीती रिवाज ह्या विज्ञान निष्ठ नसून काही अंधश्रद्देला पोषक आहेत. अंधश्रद्धा व अज्ञान समाज जीवनातील अडसर आहेत त्यामुळे समाजातील अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रत्येकाकडून सर्वोतोपरी प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले आहे.
दर रविवार, चलो बुद्ध विहार या अभियानातर्गत पंचशिल बुध्द विहार, न्यु भाग्य नगर, लातूर येथे सामूहिक बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भिक्खू पय्यानंद थेरो यांनी तथागत बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पाने धुपाने पुजन केले. यावेळी त्रिशरण पंचशिल व बुध्द वंदना घेण्यात आली. तसेच बावीस प्रतिज्ञा व भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी निवृत्ती माने, लक्ष्मीबाई माने व बहुजन समाज पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वनाथ आल्टे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी भिक्खू पय्यानंद थेरो मार्गदर्शन करताना म्हणाले की, प्रत्येक समाजामध्ये अनिष्ट रूढी, प्रथा, चालू आहेत, तद्वता अंधश्रद्धा व कर्मकांड यामुळे मानवाच्या बुद्धिमत्तेच्या प्रगल्भतेमध्ये बाधा निर्माण होऊन मानव स्वतंत्र वैचारिक प्रगल्भ होऊ शकत नाही. तेंव्हा समाजातील प्रत्येकाने वैचारिक व विज्ञानवादी बनावे. मानवाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता प्रत्येकाने अनिष्ट रूढी परंपरा व अज्ञान याचा त्याग करणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे आणि प्रा. विश्वनाथ आल्टे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिरुद्ध बनसोडे, उदय सोनवणे, ज्योतीराम लामतुरे, डॉ. अरुण कांबळे, प्रा. सतीश कांबळे, निलेश बनसोडे, पांडुरंग अंबुलगेकर, भानुदास गायकवाड, सत्यवान मांदळे, डॉ. पंडित ढगे, अंतश्वेर थोटे, व्ही. एस. भालेराव, उत्तम कांबळे, सरिता बनसोडे, सुमन उडानशिव, शकुंतला नेत्रगावकर, कांताबाई सरवदे, शोभा माने, वंदना मांदळे, सरला वारकरी, वैशाली करंजीकर, पोटभरे ताई, शोभा मांदळे, छाया कांबळे, निर्मला गौरकर, निर्मला थोटे, सुनीता ढगे, पंचशीला बनसोडे, न्यू भाग्य नगर महिला मंडळ, राजे शिवाजी नगर महिला मंडळातील महिलानी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभिषण माने यांनी केले तर आभार मिलिंद धावारे यांनी केले. यावेळी न्यु भाग्य नगर परिसरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments