*निलंग्यात मुस्तफा शेख यांच्या हस्ते भगवा फडकवून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा*
निलंगा/प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मुंबई येथील शिवसेनेच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरासाठी गेले असल्याने शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मुस्तफा शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वज फडकवून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
आज निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मुस्तफा शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साखर वाटून सर्व व्यापारी व जनतेचे तोंड गोड करण्यात आले व शिवसेना यापुढे जोमाने कार्य करीत राहील समाज हितासाठी प्रत्येक शिवसैनिक काम करून शिवसेना घराघरापर्यंत पोहोचवण्या साठी प्रयत्नशील असेल व यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना आपला भगवा फडकवण्यासाठी कार्यरत असेल असे मत शिवसेनेचे उप तालुका प्रमुख मुस्तफा शेख व युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे यांनी यावेळी व्यक्त केले
यावेळी मोठ्या घोषणाबाजी व आतिश बाजी करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी मुस्तफा शेख दयानंद चोपणे धम्मानंद काळे प्रशांत वांजरवाडे महेबुब मिस्त्री राहुल बिरादार कांबळे सविता पांढरे अरुणा माने बजरंग कांबळे सरतापे आदी सह युवा सेना शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments