माजी विद्यार्थिनी अश्विनी मद्रे यांचा बालाजी सुवर्णकार गुरुजींनी केला सन्मान.
उदगीर प्रतिनिधी.
श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथील माजी विद्यार्थिनी अश्विनी मद्रे यांचा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष , छत्रपती राजर्षीशाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अमृतसंदेश देऊन सन्मान करण्यात आला.
अश्विनी मद्रे या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नामांकित संस्थेत सेवेत कार्यरत असून तिच्या कार्याचा गौरव म्हणून तिचा हा सन्मान करण्यात आला .या सन्मानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त करून सुवर्णकार गुरुजी यांच्या या कार्याला व शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments