उदगीर प्रतिनिधी.
श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असून त्याबरोबरच ते विद्यार्थ्यांना स्वावलंबी घडवण्याचे शैक्षणिक केंद्र असल्याचे मत उदगीर येथील दैनिक राजधर्माचे जेष्ठ पत्रकार अंबादास अलमखाने यांनी व्यक्त केले. ते श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयात आयोजित केलेल्या विद्या विषयक वर्ष 2023._ 2024 च्या पाठ्यपुस्तक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजाराम भोसले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव दापकेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काटमपल्ले, पालक श्री कबनुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार अंबादासराव अलमखाने पुढे म्हणाली की, सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी अहोरात्र जिद्द ,मेहनत, चिकाटीच्या स्वबळावर विद्यार्थ्यांनी स्वयं अध्यन करून उच्च पदावर स्थापन व्हावेत व शाळेचे, आई-वडिलांचे, समाजाचे नाव मोठे करावेत असाही प्रमुख सल्ला यावेळी त्यांनी दिला.
याप्रसंगी सुधाकर रावजी दापकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या उज्वल यशासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनी शैक्षणिक विद्या विषयक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. या वितरण प्रसंगी शाळेतील सहशिक्षिका श्रीमती मीनाताई गायकवाड, बालाजी सुवर्णकार गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक राजाराम भोसले यांचा 57 वा वाढदिवस व श्री सुनील बिरादार यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सुवर्णकार गुरुजी यांनी केले. तर आभार प्रदर्शन नागनाथ सोमवंशी गुरुजी यांनी केले.
या पाठ्यपुस्तक वितरण सोहळ्याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांना ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा राजकुमार घुले दर्शनाताई घुले श्वेता ताई रहा गंडाले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबाराव दुपारे, राष्ट्रीय सचिव जाफरखान शेख राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख तथा आदर्श शिक्षक सुभाष तगाळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments