Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*शालेय शैक्षणिक साहित्यात मोठ्या प्रमाणात भाववाढ*

*शाळा सुरू झाल्या स्कूल चले हम. महागाईचा भस्मासुर शालेय शैक्षणिक साहित्यात मोठ्या प्रमाणात वाढ.*
सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त!.*

लातूर प्रतिनिधी.

उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्ट्यानंतर 15 जून पासून नियमित शाळा सुरू झाल्या असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष 23- 24 साठी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिले असले तरी या पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी हवे त्या प्रमाणात कोरी पाने जोडण्यात आलेले दिसून येत नाही . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना नवीन शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी साहित्य खरेदी बाबत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे सर्वसामान्य शिक्षण प्रेमी नागरिकांचे साहित्य खरेदी करण्यासाठी तारांबळ उठली असून मागील दोन वर्षाच्या करोणाच्या कालावधीमध्ये शाळा बंद असल्यामुळे शैक्षणिक साहित्य पुरवठा करणारी दुकानदार यांचे फार मोठे नुकसान झाले होते. परंतु या चालू शैक्षणिक वर्षात मात्र नियमित शाळा सुरू झाल्या असून एकीकडे शेतकरी राजांना पावसाची चिंता तर एकीकडे सर्वसामान्य शिक्षण प्रेमी नागरिक आपली पाल्ये शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहेत .मात्र त्यांना लागणारे स्कूल बॅग, वाटर बॅग, कंपास, वह्या , यासह आदी साहित्य खरेदी करताना साहित्याच्या दरामध्ये मात्र खूप प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षण प्रेमी पालकांचे नागरिक मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्यासाठी मात्र त्रासला आहे. शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये 25 ते 30 % भाव वाढलेले चित्र सध्या बाजारात दिसून येत येत आहे. मात्र एवढे असूनही लातूर जिल्ह्यातील काही नामांकित शाळा इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी पालकांची आर्थिक लूट करत असून इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी नामांकित शाळेत प्रवेश मिळण्यासाठी रुपये रक्कम १०,००० हजार रुपयांची शाळेच्या विकासाच्या निधी पोटी पालकांची आर्थिक लूट करून स्थानिक स्वराज्य संस्थेतील स्थानिक कमिटीतील शिक्षण सम्राट आर्थिक सम्राट होत आहेत . असे असताना डोळ्या देखत पहात असताना देखील शासन मात्र या महाराष्ट्रातील नामांकित अशा शाळेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आज सर्वत्र पहा वयास मिळत आहे. शासनाच्या आरटीई कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असताना देखील लातूर जिल्ह्यातील बऱ्याच शाळा इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गापर्यंत असून नामांकित शाळेत शिक्षक मात्र शिक्षण उत्कृष्ट देत असताना देखील पुढील शिक्षणासाठी आठवीच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी मात्र पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याती खाजगी विद्यालयातील (शाळांची) इयत्ता पाचवी ची पटसंख्या मात्र कमी होत असल्याचे चित्र सध्या लातूर जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या असणाऱ्या शाळेतील पटसंख्या टिकवण्यासाठी मात्र शिक्षक अडचणीत आले असून शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीची पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षक वर्ग पालकांना आपल्या शाळेचे महत्त्व पटवून देऊन शिक्षणाची उत्तम प्रकारे आम्ही घेण्यासाठी प्रयत्नशील असताना देखील पालक वर्ग मात्र या बाबीकडे दु जोरात देत आहेत. शाळेतील पटसंख्या टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पालकांना विनवणी करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ‌.मात्र पालक वर्ग इयत्ता आठवीला प्रवेशासाठी आर्थिक लूट थांबवण्यासाठी व आपल्या पाल्यांचे शिक्षण नामांकित अशा शाळेत व्हावे यासाठी शहरातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेत उत्तम शिक्षण घेऊन मात्र इयत्ता आठवीच्या वर्गाच्या प्रवेशासा आयोजि नामांकित अशा शाळेत इयत्ता पाचवी वर्गालाच प्रवेश मिळवण्यासाठी नामांकित शाळेत प्रवेश घेऊन शाळा स्थलांतराच्या प्रवेशासाठी नामांकित शाळेतील मुख्याध्यापकांची पत्र आणत आहेत. आर्थिक लूट तर होत असल्यामुळे चौथी वर्गात उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी नामांकित अशा प्रवेश शाळेत मिळवण्यासाठी पालक वर्ग रांगेत उभे राहून प्रवेश घेत असल्याचे चित्र सध्या लातूर जिल्ह्यातील काही नामांकित शाळेत दिसत आहे.
नामांकित अशा शाळेत पालकांची आर्थिक लूट होत असताना शिक्षण विभाग मात्र गप्प घेऊन का बसले आहे असाही प्रश्न सध्या पालक वर्गामध्ये चर्चा सुरू आहे. नामांकित अशा शाळेत पालकाकडून आर्थिक लूट करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकावर व स्थानिक संस्थांच्या कमिटीच्या पदाधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करतील का असाही प्रश्न पालकांपुढे पडत आहे.

Post a Comment

0 Comments