लातूर:-
शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला आज रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त 'गद्दार दिवस' साजरा करण्याचे आंदोलन गांधी चौक,लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील,शहर जिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे,जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली असल्याचा संदेश या निषेध आंदोलनातून दिला.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी..! चले जाव-चले जाव..गद्दार गुहाटी चले जाव..! महाराष्ट्र त्रस्त..खोके घेऊन गद्दार मस्त पन्नास खोके माजलेत बोके..!गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..! महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार..! खोके सरकारचा चालणार नाही थाट गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट..!पन्नास खोके,गद्दार 'Not' ओके..!खोके सरकार हाय हाय,गद्दारांना इथे जागा नाय..!अशा गद्दारांविरोधात विविध घोषणा देत गांधी चौक लातूर येथे या खोके सरकारविरोधात खोके हातात घेवून आंदोलन केले.
यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभैय्या पाटील, महिला शहर जिल्हाध्यक्ष रेखाताई कदम,माजी नगराध्यक्ष ऍड.व्यंकटजी बेंद्रे,माजी नगरसेवक नवनाथ आल्टे,लातूर शहर विधानसभा अध्यक्ष इब्राहिम सय्यद,रघुनाथ कुचेकर,रा.यु.काँ.जिल्हाध्यक्ष भरत सुर्यवंशी,शहरजिल्हाध्यक्ष समीर शेख,विशाल आवाडे,प्रणिताई सुर्यवंशी,स्नेहा मोटे,जाकीर तांबोळी,विशाल विहीरे,रामभाऊ रायेवार, डी.उमाकांत,सोहम गायकवाड,ऍड.प्रदिपसिंह गंगणे,प्रविणसिंह थोरात,गोविंद जाधव,अविनाश टिके,यशवंत भोसले,अशोक गरड,आत्माराम सांळुंके,रितेश दूधनकर,संगमेश्वर उटगे,संदीप शेटे,बिलाल शेख,शिवाजी सावंत,शिवाजी शिंदे,धनंजय चव्हाण,संतोष औटी,बशीर शेख,बंटी राठोड,बाबा शेख,अमित पाटील,आदर्श उपाध्ये,मयुर जाधव,उमेश बारकुले,बबलू बागवान,नवनाथ भोसले,सिद्धार्थ सुर्यवंशी,सुलेमान सय्यद,मोहन दिवटे,इम्रान शेख,पांडे,बाळासाहेब पोटभरे,अशुतोष माळी,हनमंत रजपुत,बसवेश्वर रेकुळगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments