औराद ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागला सेवानिवृत्त व रोजंदारी कर्मचाऱ्यांचा लळा...
सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आकृतीबंधातील कर्मचारी मात्र गावात पाणी सोडण्याची कामे करतात तर नियमबाह्य कर्मचारी असलेले कर्मचारी शासकीय दस्तावेज हाताळतात.
औराद शहाजानी
शासनाच्या नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांना वयाचे बंधन घालुन दिलेले असतानाही येथील ग्रामपंचायत मध्ये मात्र सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचा नियम डावलून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी व रोजंदारी पध्दतीने काम करणारे कर्मचारी यांना कार्यालयीन दस्तावेज हाताळण्याचे कामे पाहतात तर आकृतीबंधात असलेले कर्मचारी लिपिक वसुली कारकून हे मात्र गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे काम करत असतात त्यामुळे येथील कारभार मात्र राम भरोसे सुरु असल्याचे दिसून येते.
गाव जवळपास तालुकापातळीचे गाव असल्यामुळे गावाला शासनाच्या नियमानुसार आकृतीबंधामध्ये फक्त सहा कर्मचारी नोंद आहेत व ते आज रोजी रुजू पण आहेत तरी येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानीमुळे व यांचे त्या कर्मचाऱ्यांसोबत आर्थिक समन्वय होत असल्यामुळे आकृतीबंध मधील कर्मचाऱ्यावर अन्याय करून शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सर्व कर्मचाऱ्यांवर काम करत नसल्याने दबाव दाखविणे, सर्व कर्मचाऱ्यांची नोंद घेणे व मानधन काढणे तसेच गावातील आलेल्या जनतेला मुलभूत सुविधा पोहंचवणे व मुलभूत कागदपत्रे तयार करून देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच ग्रामपंचायतीचे दस्तावेज हाताळणे व दैनंदिन अर्थिक व्यवहार नोंदी घेणे बांधकाम परवाने , ना हरकत व इतर कागदपत्रे तयार करुन देण्याची जबाबदारी सुध्दा या नियमबाह्य कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नियमबाह्य असलेले कर्मचारी हे त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करत गावातील जनतेला सुविधा पुरविण्याच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक करत आहेत तर अनेक चुकीच्या पध्दतीने जन्म , मृत्यू नोंदी घेत आहेत तर विवाह नोंद सुध्दा चुकीच्या पध्दतीने नोंदी केल्याचे पहावयास मिळते तर दुसरे वयोवृद्ध सेवानिवृत्त असलेले कर्मचारी हे मात्र झारीतील शुक्राचार्य असल्याप्रमाणे सर्व आर्थिक नियोजन तेच पाहत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय करत कर्मचाऱ्यांचे काम केलेले दिवस व रजा तसेच त्या कर्मचाऱ्यांची उचल दाखविणे बंधनकारक असतानाही हे कर्मचारी मात्र मला दाखविण्याचे अधिकार नाहीत मला सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच काम करावे लागते त्यामुळे मी काहीच दाखवु शकत नाही असे म्हणत अनेक कर्मचाऱ्यांचे मानधन किंवा रोजगार जाणुनबुजून कमी काढल्याचे कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे. त्यामुळे या नियमबाह्य लोकांवर अधिकारी व पदाधिकारी यांचे वरदहस्त असल्याने व पंचायत समितीच्या सुध्दा वरीष्ठांचे या कर्मचाऱ्यांना समन्वय असल्यामुळे या मनमानी कारभाराकडे डोळेझाक होत असल्यामुळे गावातील जनतेला काय तर कर्मचाऱ्यांना सुध्दा या ग्रामपंचायत मध्ये न्याय मिळत नाही तसेच सरपंच महिला असल्यामुळे त्या सुध्दा ग्रामपंचायत कार्यालयात फक्त मासिक बैठक किंवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यापुरतेच हजर राहतात नंतर मात्र संबंधित सगळा कारभार मात्र नियमबाह्य असलेले कर्मचारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनावरच चालु असल्यामुळे गावकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे त्यामुळे पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या वरीष्ठांनी या कारभारा जातीने लक्ष घालून नियमबाह्य कर्मचाऱ्याना बाहेरचा रस्ता दाखविणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांचे सुर निघत आहेत.
--------+++++---+++++++-------++++++--------
सेवानिवृत्त कर्मचारी हे लिपिक होते. सध्या अनुभवी लिपिक नाही. जे मुख्य कर्मचारी आहेत ते पाणी सोडणे, इतर काम पाहतात. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी तसेच नवीन कर्मचाऱ्यांना ते प्रशिक्षण देण्यासाठी लिपिक काम समजावण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांला तात्पुरत घेतले आहे.असे औराद शहाजनी येथील ग्रामसेवकांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

Post a Comment
0 Comments