“शिक्षकांनी समाजात सामाजिक न्यायाची भूमिका प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे”
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक अजित शिंदे यांचे प्रतिपादन
लातूर :-
भारत हे लोक कल्याणकारी राष्ट्र आहे त्यामुळे देशातील शिक्षकांनी समाजामध्ये सामाजिक न्याय अध्यापनाच्या माध्यमातून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश हा शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनेल असे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथील उपसंचालक अजित शिंदे यांनी नुकतेच केले.
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य तथा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय विभाग, मुंबई, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एच.एस.सी.व्होकेशनल विभागातील पूर्ण वेळ शिक्षक, पूर्ण वेळ शिक्षक प्रात्यक्षिक यांचे दि. 25 मे ते 14 जून 2023 या कालावधीत 21 दिवसाचे सेवांतर्गत प्रशिक्षण लातूर येथे संपन्न झाले. याचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ कॉक्सिट महाविद्यालयात संपन्न झाला यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनीषा बोरुळकर, विशेष उपस्थिती म्हणून रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, सेवानिवृत्त अधिकारी सोमेश्वर वाघमारे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. संजय गवई, आयटीआयचे मुख्याध्यापक शिवाजी कवलेकर, समन्वयक संदीप माने, मुख्य संयोजक प्रा. प्रशांत उघाडे, प्रा. संतोष पांडे, प्रा. नेताजी रेड्डी, प्रा. लियाकत अली, कार्यालयीन अधीक्षक राजेश हिवाळे, वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर गोटे, वरिष्ठ लिपिक व्यंकट काळे, विजय काळे, रामकृष्ण पोद्दार, प्रा. तानाजी सगर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना अजित शिंदे म्हणाले की, सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज आपण सक्षम व उत्कृष्ट शिक्षक बनले आहात. सध्याच्या काळामध्ये शिक्षकांनी नवनवीन उपक्रम राबवून आपल्या विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध क्षमतांचा विकास झाला आहे. आज लातूरमध्ये मराठवाडा विभागातील शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण अत्यंत सुरेख आणि सुंदर पद्धतीने संपन्न झाले त्यामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये या प्रशिक्षणामुळे एक वेगळा लातूर पॅटर्न मला बघायला मिळाला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून महाराष्ट्रातील इतर ठिकाणी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मनोहर वानखेडे (दादा) म्हणाले की, आपल्या सर्वांच्या अथक परिश्रम, शासकिय पाठपुरावा आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथील सहसंचालक सतीश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने आपले प्रशिक्षण लातूर येथे उत्साहात संपन्न होत आहे. या प्रशिक्षणासाठी आपण सर्वतोपरी मदत केली त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना सोमेश्वर वाघमारे म्हणाले की, शासकीय अधिकारी आणि महाविद्यालयातील शिक्षक यांच्या संयुक्त समन्वयाने शैक्षणिक क्षेत्रात आपण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक वेगळा पॅटर्न निर्माण करीत आहोत याचा मला मनस्वी आनंद झालेला आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. संजय गवई म्हणाले की, या प्रशिक्षणाचा लाभ आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिला पाहिजे असे सांगून आपली जबाबदारी आता वाढली आहे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्रा. लियाकत अली म्हणाले की, आपण अथक परिश्रमातून 21 दिवसीय सेवा अंतर्गत प्रशिक्षण आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न करीत आहोत. भविष्यातील सर्व प्रशासकीय कार्यासाठी आपणास मी सर्वतोपरी मदत देण्यास तयार असल्याचे सांगून पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमांमध्ये डॉ. मोहन शिंदे, प्रा. विद्या पुरी, प्रा. शैलेश कचरे, प्रा. वैशाली फुले यांनी आपपापली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना मनीषा बोरूळकर म्हणाल्या की, प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला स्व:ची जाणीव होते. शिक्षकाद्वारे सामाजिक न्यायाचे कार्य हे पुण्याचे कार्य आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणामधील गुणवत्तापूर्ण माहितीचे ज्ञान प्राप्त होते. या प्रशिक्षणातून आपण स्वतःला घडविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आपण सर्वांनी नैतिक मूल्याची जोपासना करून त्याची प्रत्यक्ष कृती मानवी व्यवहारात केली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी विपश्यनेचा अवश्य लाभ घ्यावा असेही त्या म्हणाल्या.
या 21 दिवसीय सेवांतर्गत प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते म्हणून विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, प्राचार्य डॉ. सिद्धार्थ सूर्यवंशी, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. हरिप्रसाद सोमाणी, प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, डॉ. धनंजय गायकवाड, प्रसिद्ध वक्ते उद्धव बापू फड, प्रसिद्ध कवि योगिराज माने, डॉ. लहू वाघमारे, डॉ. श्रीहरी वेदपाठक, डॉ. बालाजी भुरे, विवेक सौताडेकर, डॉ. दशरथ भिसे, डॉ. संजय गवई, डॉ. गुणवंत बिरादार, उपप्राचार्य कल्याण कांबळे, डॉ. गणेश बेळंबे, डॉ. रामेश्वर स्वामी, प्रा. ढोले, प्रा. दिलीप बोईनवर, प्रा. मलकमपट्टे, अॅड. सुजाता माने, डॉ. गिरी, डॉ. पत्रिके आदी तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणा दरम्यान आस्थापना भेटी अंतर्गत महानंद दुग्ध शाळा, लातूर, गणेश बेकरी, लातूर व रेना सहकारी साखर कारखाना, लातूर येथे भेटी देऊन त्याचा अहवाल तयार करण्यात आला.
यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत उघाडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संतोष पांडे यांनी केले आणि आभार प्रा. तानाजी सगर यांनी मानले.
या प्रशिक्षणाला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून एकूण 102 शिक्षक-शिक्षिका प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कै. प्रयागबाई पाटील महाविद्यालयाचे संस्थाचालक तथा प्राचार्य एकनाथजी पाटील, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्रा. किसनाथ कुडके, प्रा. व्यंकट दुडीले, प्रा. देविदास वसावे, प्रा. दयानंद टेंकाळे, प्रा. अशोक चव्हाण, प्रा. राजूरकर यांच्यासह सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments