*'ट्री ट्रस्ट ऑफ इंडिया' च्या मराठवाडा समन्वयकपदी अमोल स्वामी*
लातूर :
ट्री ट्रस्ट ऑफ इंडिया (भारतीय वृक्ष न्यास) या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या पर्यावरण समितीवर वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे कार्यकारी प्रमुख अमोल स्वामी-दुबलगुंडी यांची निवड झाली असून, त्यांना निवडीचे पत्र शुक्रवार, १६ जून रोजी प्राप्त झाले आहे.
ट्री ट्रस्ट ऑफ इंडिया ही संस्था देशपातळीवर पर्यावरण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धन, तापमानवाढ, स्वच्छता या क्षेत्रात अग्रेसर पद्धतीने काम करणारी ही संस्था ग्रीन मॅन विजयपाल बघेल यांनी स्थापन केली असून, या संस्थेच्या माध्यमातून आजवर १० लाखांहून अधिक झाडांचे संवर्धन करण्यात आले आहे. कार्यकारी संचालक धुर्वेश बघेल यांनी अमोल स्वामी यांच्या निवडीचे पत्र दिले असून, मराठवाड्यात या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रात कार्य केले जाणार आहे. या निवडीबद्दल राजे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रमुख श्रावण जंगम, वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, उमाकांत मुंडलिक, रामेश्वर बावळे, डॉ. अजित चिखलीकर, विजय जंगम, वैजनाथ स्वामी, अशोक मठपती, जगदीश स्वामी, ज्येष्ठ विधिज्ञ गंगाधरआप्पा हामने, भालचंद्र मानकरी, मन्मथआप्पा पंचाक्षरी, योगेश चडचणकर, सुधीर मठपती, प्रशांत बोळेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, विजय मंडगे, लातूर वृक्षचे समन्वयक सुपर्ण जगताप, अमर साखरे, वृक्षमित्र सरफराज मणियार आदींनी अभिनंदन केले आहे.
*दुष्काळी कलंक पुसून टाकण्यासाठी काम करणार : अमोल स्वामी*
----------------------
गेल्या ६ वर्षांपासून वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेत काम करतो आहे. वसुंधरा प्रतिष्ठानने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत वृक्षांची चळवळ मनामनात रुजविली आहे. ट्री ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पर्यावरण क्षेत्रात काम करायचे आहे. मराठवाडयाची दुष्काळग्रस्त भाग म्हणून झालेली ओळख कायमची पुसून टाकण्यासाठी आपण काम करणार आहोत. लवकरच मराठवाडास्तरीय पर्यावरण परिषद आयोजित करून प्रत्येक जिल्ह्यात कामाला सुरुवात करणार आहोत.

Post a Comment
0 Comments