*प्रत्येकाने वृक्षारोपण कार्यात पुढे यावे : प्रेरणाताई होनराव*
*वसुंधरा प्रतिष्ठान आणि त्रिपुरा महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण उपक्रम*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
लातूर :
वृक्ष लागवड आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून, या कार्यात प्रत्येकाने स्वच्छेने पुढे येण्याची आवश्यकता आहे. वृक्षांची चळवळ ही लोकचळवळ व्हावी यासाठी 'एक व्यक्ती:एक वृक्ष' ही संकल्पना पुढे यायला हवी, असे प्रतिपादन युवा नेत्या प्रेरणाताई होनराव यांनी केले. वसुंधरा प्रतिष्ठान, त्रिपुरा ज्युनिअर सायन्स कॉलेज व राजगुरू विद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रिंगरोडवरील त्रिपुरा महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या आठ वर्षांपासून लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्य करीत आहे. या प्रतिष्ठानने आजवर अनेक नाविन्यपूर्ण आणि हटके उपक्रम हाती घेत वृक्षांची चळवळ मनामनात रुजविली आहे. प्रतिष्ठानचा आदर्श सर्वांनी डोळ्यांसमोर ठेवून वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यात पुढे येण्याची गरज आहे, असे यावेळी प्रेरणाताई म्हणाल्या. वसुंधरा प्रतिष्ठानने प्रेरणाताई होनराव यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात २१ पर्यावरणपूरक झाडांची लागवड केली. या झाडांसोबत आपण आपला पुढचा वाढदिवस साजरा करू, असा संकल्प यावेळी प्रेरणाताई यांनी केला. या वृक्षारोपण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्यकारी प्रमुख अमोलआप्पा स्वामी, रामेश्वर पुणे, विजय कानडे, दीपक पुणे, किरण आलुरे, विकी उलगडे यांच्यासह प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments