Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*कासारसिरसी येथील अप्पर तहसील कार्यालयाला नागरिकाकडून विरोध सोमवारी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण*


कासारसिरसी येथील अप्पर तहसील कार्यालयाला नागरिकाकडून विरोध सोमवारी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण


निलंगा:-

कासारसिरसी येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय नागरिकांच्या कामासाठी गैरसोयीचे झाले आहे तहसील कार्यालय निलंगा येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी कर्मयोगी स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीने एका निवेदनाद्वारे उपविभागीय आधिकारी यांच्याकडे केली असून सोमवारी दि. २४ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
औसा विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या निलंगा तालुक्यातील ६३ महसूली गावासाठी कासारसिरसी ता. निलंगा येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत नुकताच शासन आदेश आला आहे या अप्पर तहसील कार्यालयाशी कासार सिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी, भूतमुगळी यासह अन्य मंडळातील कांही गावे असे एकूण ६३ महसुली गावांचा प्रशासकीय कारभार अपर तहसीलदार कार्यालयातून चालणार आहे. या भागातील लोकांना विधानसभा मतदारसंघ वेगळा तर तहसील कार्यालयाचे ठिकाण वेगळे म्हणून शासनाने अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचे आदेश दिले असले तरी यासाठी अनेक गावांनी कडाडून विरोध केला आहे. 
शिवाय आम्हाला निलंगा येथेच तहसील व अन्य कार्यालय सोईचे होणार असून निलंगा येथे पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, पोलिस आधिकारी कार्यालय, सहकार कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, न्यायालय असे अनेक कार्यालय आहेत. त्यामुळे एका कामामध्ये विविध विभागाचे काम करता येतात शिवाय अनेक गावांना निलंगा शहर जवळ तर कासारसिरसी अंतर दुरवर होणार असल्याने बहूतांश गावातील ग्रामपंचायतीने निलंगा येथेच आमचे गाव ठेवावे या मागणीसाठीचे ठराव घेणे सुरू केले असून कांही गावातील कार्यकर्त्यांनीह कर्मयोगी . शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समिती स्थापन करून उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना आम्हाला निलंगा येथेच ठेवण्यात यावे यासाठी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संभाजी तारे, कार्याध्यक्ष अशोक सूर्यवंशी, सचिव दयानंद मुळे, उपाध्यक्ष रामकिशन सावंत, अनिल आरीकर यासह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments