“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक आणि पालकाची भूमिका महत्त्वाची”
प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई
लातूर
आजचे युग स्पर्धेचे नसून प्रेझेंटेशनचे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केले.
महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय (कला आणि वाणिज्य शाखा), लातूर द्वारा नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांचा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने सत्कार आणि शैक्षणिक वर्ष २०२३-२४ वार्षिक नियोजन बैठक आयोजित करण्यात आला होती यामध्ये सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. रवींद्र सुरवसे, कला शाखा समन्वयक प्रा. रवी सोनवणे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील विविध शाखामध्ये कला आणि वाणिज्य शाखा महाविद्यालयाचे भूषण आहे. पूर्वीपासूनच या शाखामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व यशाची परंपरा आपल्या सर्वांच्या सहकार्याने सातत्याने सुरू ठेवली आहे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे म्हणाले की, कला आणि वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्यालय आणि ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या महाविद्यालयामध्ये समाजातील गरीब, गरजू आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांशी सातत्याने संवाद साधला पाहिजे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखेच्या विकासासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासन आणि पालकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. गौरी स्वामी आणि सेवक राजाभाऊ बोडके यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रा. बि. एम. बिचकाटे आणि डॉ. अश्विनी रोडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य प्रा. संजय पवार म्हणाले की, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातून सातत्याने गुणवंत विद्यार्थ्यासोबत गुणवान विद्यार्थी निर्माण केले जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाकडे आपण सर्वांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचन, लेखन आणि चिंतन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. रवी सोनवणे यांनी केले तर आभार प्रा. रवींद्र सुरवसे यांनी मानले. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयातील (कला आणि वाणिज्य शाखा) शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments