विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाचे स्मरण करावे
डॉ. विजयकुमार सोनी
लातूर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिपत्रकाप्रमाणे आपल्या महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य आणि संगणकशास्त्र प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष या वर्गाचे नियमित तास सुरू झालेले आहे. तेव्हा आपण सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून ज्ञानार्जन केले पाहिजे आणि आपल्या आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे स्मरण केले पाहिजे असे प्रतिपादन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार सोनी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिपत्रकाप्रमाणे दि. १५ जुलै २०२३ पासून पदवी वर्गाचे वाणिज्य, समाजकार्य आणि संगणकशास्त्र प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, संगणकशास्त्र समन्वयक प्रा. सुप्रिया बिराजदार, वाणिज्य विभागातील डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. अर्चना लखादिवे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. सोनी म्हणाले की, आज कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य आणि संगणक या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धता होत आहे. तेव्हा आपण सर्व विद्यार्थ्यांनी नियमित वर्ग करून अध्ययन करावे तसेच या विषयासंबंधी ग्रंथालयातील संदर्भीय पुस्तकांचे वाचन करून अधिकाधिक समृद्ध व्हावे असेही ते म्हणाले.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा प्रा. सोमेश्वर पंचाक्षरी यांना पीएच. डी. पदवी प्रदान केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल डोंबे यांनी केले तर आभार डॉ. सोमेश्वर पंचाक्षरी यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य, समाजकार्य आणि संगणकशास्त्र विभागातील प्रा. सुजाता पाटील, प्रा. अश्विनी इंद्राळे, प्रा. सोनाली खुब्बा, प्रा. दाणे मॅडम, बालाजी डावकरे आणि आनंद खोपे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य आणि संगणकशास्त्र विषयातील विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments