*मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करा- भारतीय राष्ट्र समिती*
मुखेड :-( प्रतिनिधी/बळीराम पाटील)
तालुक्यातील मौजे येवती,जाहूर, बाऱ्हाळी, अंबुलगा येथील महामंडळात झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे, सामान्य जनतेचे तसेच व्यापाराचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.शेतकऱ्याच्या शेतातील पिक मातीसह वाहून गेले.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले.सामान्य जनतेचे पावसाच्या पाण्याने घराचे जनावरांचे अतोनात नुकसान झाले. पावसाचे पाणी दुकानात शिरल्यामुळे व्यापाराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सर्व जनता आर्थिक संकटात सापडली त्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले.विनाट मदत देवून विशेष मदत जाहीर करून नागरिकांना तत्काळ दिलासा देण्यात यावा याबाबत मुखेड भारतीय राष्ट्र समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बळीराम पाटील खैरकेकर विलास पाटील बेळीकर,नितीश पाटील खैरकेकर आनंद पाटील इंगोले बेरळीकर, दिनकर पाटील जुन्ने बेळीकर, गणेश पाटील जुन्ने बेळीकर, बाबूराव पाटील वडजे,विलास हंगरगे खैरकेकर, सुधाकर पाटील शिंदे खैरकेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments