महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार संपन्न
लातूर
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात नवनियुक्त कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), महाविद्यालयाचे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक प्रा.जी.एम.धाराशिवे, अॅड.काशिनाथ साखरे, प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदर्गे, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, स्टाफ सेक्रेटरी कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, समाजकार्य विभागप्रमुख डॉ.दिनेश मौने, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय समोरील महात्मा बसवेश्वर यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांचा महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षामध्ये सत्कार करण्यात आला.
यावेळी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे लातूर शहरातील एक नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातील व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य केले जाते याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून डॉ.संजय गवई यांची प्रभारी प्राचार्यपदी संस्थेने नेमणूक केली त्याबद्दल सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानून प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई म्हणाले की, आपली कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळामध्ये निवड या बद्दल आम्हाला आनंद झाला आहे. आपल्याबद्दल लातूरकरांमध्ये आपुलकी आणि प्रेमाची भावना आहे. आज आपण आमच्या महाविद्यालयामध्ये येऊन सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आणि महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments