*श्री शिवाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
लातूर:-
लातूर येथील सरस्वती कॉलनी भागातील श्री.शिवाजी बालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संगाप्पा बावगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य व गायन सादर केले तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. याप्रसंगी लातूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी व दानशूर श्री हरीश कटारिया यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थाध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील, संस्था सचिव श्री अजय जाधव, दानशूर श्री हरीश कटारिया, कोषाध्यक्ष बालाजी पौळ, सहसचिव सौ. राजश्रीताई पाटील, संचालक प्रा. वसंत पाटील, संचालिका सौ. मेघाताई जाधव, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंडाप्पा बावगे, उपमुख्याध्यापक सर्वोत्तम कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र कटके, पर्यवेक्षका सौ. सविता झिरमिरे, नूतन पर्यवेक्षक प्रवीण घोरपडे, तसेच बालक मंदिरच्या प्रमुख आशाताई खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments