*वारणेचा वाघ*
जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव असे सांगणारे, माझी मैना गावावर राहिली हो...माझ्या जीवाची होतेय काह्यली हो....हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्रेरणागीत डफावर थाप मारून अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे सहकारी गायचे तेव्हा सारा महाराष्ट्र पेटून उठायचा. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रवासाची सुरुवात सांगली जिल्ह्यातील वाटेगावाहून झाली. जन्मापासून काटेरी आयुष्य जगणाऱ्या घरात अण्णाभाऊ साठे निवडुंगासारखे फुलले. १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊंचा जन्म झाला.काही काळ ते वाटेगावात राहिले. नंतर त्यांनी आपला मुक्काम मुंबईला हलविला. लहानपणी वारणेच्या खोऱ्यात अण्णांना अनुभवाचे शिक्षण मिळत गेले. कुटुंबावर आलेली संकटे ते जवळून पाहात होते. त्यातूनच त्यांच्यातला कलाकार घडत गेला. बंडखोरीची परंपरा असलेल्या वातावरणातच अण्णाभाऊ साठे वाढत गेले. लहानपणी जातीयतेचे भयानक चटके त्यांनी सोसले. त्यांच्या आयुष्यातला थक्क करणारा भाग म्हणजे त्यांचे शिक्षण. त्यांच्या शिक्षणाबाबत मत मतांतरे आहेत. म्हणतात की, त्यांचे शिक्षण केवळ दीड दिवस झाले. तत्कालीन शिक्षण व्यवस्थेत खालच्या जातीतील मुलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना वर्गातून बाहेर काढले जायचे. याला कंटाळून त्यांनी शाळेला कायमचा रामराम केला.
आज अण्णांचे साहित्य जगभरातल्या २७ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. विद्यापीठांमध्ये त्यांचे पुस्तके अभ्यासले जातात. अण्णांच्या पाच कादंबऱ्यावर चित्रपट निघाले. अण्णाभाऊंनी जवळपास ३० हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील सर्वाधिक लोकप्रिय कादंबरी म्हणजे फकीरा. कथा, कादंबऱ्या, शाहिरी सगळ्या लेखनास त्यांची लेखणी जोरकस चालायची. अण्णांचे घराणे तमासगिरांचे घराणे होते. त्यांनी लोक मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. अशा या थोर विचारवंत, लेखकाला विनम्र अभिवादन.
शब्दांकन
श्री बालाजी मरळे
महाराष्ट्र विद्यालय प्रा शाळा, औराद शहा.
ता. निलंगा जि. लातूर
भ्रमणध्वनी : ९९२२६९९११५

Post a Comment
0 Comments