सुप्रसिद्ध व्याख्याते सतीश हानेगावे यांनी मराठवाड्याच्या शौर्य कथा जागवल्या
लातूर:-
श्री व्यंकटेश माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालय वलांडी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, बाबासाहेब परांजपे फाउंडेशन लातूर यांनी राबवलेल्या उपक्रमा अंतर्गत, प्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक, व्याख्याते, निरुपणकार जगदगुरु तूकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटक तथा महासचिव संत गाडगेबाबा प्रबोधन मंचाचे श्री सतीशराव हाणेगावे सरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री मांजीबाळे साहेब हे होते.तर प्रमूख, पाहूणे म्हणून श्री सतीश हाणेगावे सर यांनी स्थान भूषिवले. श्री हाणेगावे सरांचा सत्कार पर्यवेक्षक श्री रणजित पाटील साहेब यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चंद्रकांत माने सर यांनी केले. यावेळी मुख्य वक्ते श्री हाणेगावे सर यांनी मराठवाडा मुक्ति संग्राम कसा? व का घडला? याविषयीचा इतिहास ,अनेक घटना, प्रसंग आपल्या भाषणशैलीतून प्रत्यक्ष विद्यार्थ्यासमोर मांडून त्याविषयीचे हूबेहूब चित्र विद्यार्थ्यांच्या डोळयासमोर उभे केले. हुतात्मा वेदप्रकाश आर्य, धर्मप्रकाश आर्य यांचे बलिदान कसे झाले.
नारायण पवार यांनी निजामाच्या गाडीवर घडवून आणलेला बॉम्बस्फोट, स्वामी रामानंद तीर्थाचे समर्पण, गोविंदभाई श्राफ, बाबासाहेब परांजपे, डॉ . शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे कार्यकर्तृत्व, हुतात्मा शामलालजी आर्य, बन्सीलालजी आर्य यांचे बलिदान, शोयबउल्लखॉ पत्रकाराचे बलिदान , आर्यसमाज, वंदे मातरम चळवळ, किसान दल, शेतकरी -शेतमजूर, दलित, आदिवासी, दगडाबाई शेळके सारख्या पराक्रमी स्त्रियांचा संघर्ष शब्दबद्ध केला. निजाम आणि रजाकार,खकसार, रोहिले, पठाण, पोलीस यांच्या माध्यमातून केलेला अन्याय अत्याचार,शोषणाला वाचा फोडली.आपल्या भाषणशैलीतून हाणेगावे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून हैद्राबाद मुक्तिसंग्रामामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले बलिदान लक्षात ठेवून आपणही त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे मत प्रतिपादन केले. यावेळेस वर्ग 5 वी ते 12 वी चे जवळपास 1000 विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री मांजीबाळे साहेब ,पर्यवेक्षक श्री रणजित पाटील साहेब, धनाजी पाटील, दिलीप बच्चेवार, नामदेव कारभारी, बिराजदार नंदकिशोर, अविनाश कटके, संतोष ऊपासे, विश्वास आळंदीकर, कदम साधू, सगर बालाजी, कोळी तानाजी, रणजित हूडे, ऊमाकांत भोसले, सुधीर माने, भोसले ज्योतीराम, सचिन शिंदे, दायमी ताकदीश, सय्यद ताजोद्दीन, रमेश माने, डोंगरे संदिप, संजय शेरिकाचे, राजीव तूगावे, खरटमोल बाळाप्पा, बिरादार शंकरराव ,पाटील अमित, सौ. कोमलताई बिरादार, सौ. महानंदाताई पाटील, सौ. उषाताई कारागिर,,सौ. किर्तीताई पाटील, बोरोळे राजकुमार, रतन भंडारे, राम विजापूरे, भागवत मोदाळे, दिलीप कांबळे ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री बिराजदार नंदकिशोर यांनी तर आभार प्रा.रणजित हूडे सर यांनी मानले.

Post a Comment
0 Comments