Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*जागृती शुगरकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उच्चल रुपये २५००/-मे.टन प्रमाणे खात्यावर जमा*

*जागृती शुगरकडून  शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उच्चल रुपये २५००/-मे.टन प्रमाणे खात्यावर जमा*

लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील एफ. आर. पी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड आलाईंड इंडस्ट्रीज यांच्यावतीने २०२३-२४ च्या चालु गळीत हंगामात गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उच्चल म्हणून रुपये २५००/- प्रति मेट्रिक टन प्रमाणे उसाची बिलाची रक्कम जागृती शुगर कडून जमा करण्यात आली आहे 

*चालु हंगामात१७ दिवसात ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप*
 राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी जागृति शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अध्यक्षा तथा कार्यकारी संचालक सौ गौरवीताई देशमुख भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या जागृती शुगर ने चालु हंगामात १७ दिवसात ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून ५२,४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून कारखान्याने  चालु हंगामात २३ लाख ३२ हजार वीज युनिट   महावितरण कंपनीला निर्यात केली आहे अशी माहिती जागृति शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी दिली आहे 
उस गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिली उच्चल म्हणून रूपये २५००/- प्रती मेट्रिक टन प्रमाणे उसाची रक्कम खात्यावर जमा करण्यात आली असून संबंधित उस उत्पादक शेतकऱ्यानी आपल्या खात्यावरील रक्कम द्यावी असे आवाहन जागृती शुगर चे सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments