Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धनेगाव जी.प.च्या मुख्यद्यापिका ज्योती स्वामी यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान



धनेगाव जी.प.च्या मुख्यद्यापिका ज्योती स्वामी यांना शेगाव येथे राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान 

लातूर :-

लातूर तालुक्यातील धनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मनोहर स्वामी यांना ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने दिला जाणारा शेगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 ज्योती स्वामी या एक विद्यार्थीप्रिय  मुख्याध्यापिका असून धनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत या उपक्रमाची दखल घेऊन सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे माजी मंत्री संजय कुठे, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर आडबले, पदवीधर आमदार अभिजीत वंजारी, तसेच राज्याध्यक्ष श्याम लेडे, राज्या उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले राज्य समन्वयक विजयकुमार पिनाटे,महिला जिल्हा अध्यक्ष रेखा सुडे,राष्ट्रीय ओबीसी महासंघ.लातूर हिरालाल पाटील आधीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. धनेगाव येथील मुख्याध्यापिका ज्योती स्वामी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments