Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*मराठा आरक्षणाची वाढती धग, निलंगा तालुक्यातील एका युवकांनी जीवन संपवलं*

मराठा आरक्षणाची वाढती धग, निलंगा तालुक्यातील एका युवकांनी जीवन संपवलं

मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सावनगिरा  येथील युवक किरण युवराज सोळुंके वय २४  यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.लातुर जिल्ह्यातील या पूर्वीही  मराठा आरक्षणासाठी तीन ते चार जण  आत्महत्या केली आहे. सावनगिरा येथील मराठा समाजातील पदवीधर युवक किरण युवराज सोळुंके यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही काळापासून आंदोलन सुरु आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर काहीजण टोकाचे पाऊल उचलताना पाहायला मिळत आहे. निलंगा तालुक्यातील सावनगिरा येथील युवक  किरण सोळुंके  यांनीही असेच टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ”मी किरण सोळुंके  मराठा आरक्षणासाठी फाशी घेत आहे ”, असा उल्लेख  आहे. किरण सोळुंके यांचा मृतदेह शवविच्छेदणासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. किरण सोळुंके  यांच्या पश्चात वडील आई भाऊ बहीण,  असा परिवार आहे. या घटनेने सावनगिरा गावावर शोककळा पसरली आहे.मराठा आरक्षणासाठी अनेकजण प्राणाची आहूती देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी  आमरण उपोषणाला बसलेल्या व सध्या राज्यच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील यांनी कोणीही आत्महत्या करू नये, असं आवाहन केल्यानंतरही लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी  आतापर्यंत चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. मराठा आरक्षणासाठी ”करेंगे या मरेंगे”, अशी भूमिका मराठा समाज घेताना यातून दिसून येत आहे. त्यामुळे आंदोलनाची वाढती धग पाहता सरकार यावर कधी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments