मी अविवेकाची काजळी| फेडूनि विवेकदीप उजळी| ते योगिया पाहे दिवाळी| निरंतर|| ज्ञानेश्वरी
औराद शहा, ता. २० समाधी संजीवन सोहळा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष बावीस्सावे माऊली चौक या ठिकाणी संपन्न झाले. शेवटचे निरूपण जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश प्रवक्ते, शिवश्री सतीश हानेगावे यांचे होते. मी अविवेकाची काजळी| फेडूनि विवेकदीप उजळी| ते योगिया पाहे दिवाळी| निरंतर|| या विषयावर होते. वारकरी संप्रदायातल्या साधुसंताने ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा, नरहरी सोनार, तुकोबाराय, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांनी समतेचा, विवेकाचा, मानवतेचा विचार जगासमोर ठेवला. जीवनाकडे शुद्ध विवेक बुद्धीने बघितले पाहिजे असे सांगितले. विवेकाने जीवनातील व जगातील सर्व प्रश्न सोडवता येतात.
अविवेकाची काजळी म्हणजे अज्ञान ते जीवनातील दुःखाचे मूळ आहे. त्यावरील विवेकाचा उपाय यामुळे निरंतर जीवनामध्ये आनंद प्राप्त करता येऊ शकतो. तीच अखंडपणे- निरंतर कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तीयोगी यांची दिवाळी असते असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी या निरुपण प्रसंगी विचारपीठ अधिकारी ह. भ. प. गणपतराव सुतार, अध्यात्माचे गाडे अभ्यासक गोपाळराव शिंदे गुरुजी, पांडुरंग भंडारे, लक्ष्मण बोंडगे, प्रवचनकार शशिकांत पाटील, दत्तात्रय महाराज, माजी मुख्याध्यापक जाधव सर थेरगाव, गणेश मरगणे व अनेक मायमाऊल्यांची उपस्थित होती. याप्रसंगी आयोजक व वारकऱ्यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांचा फोटो देऊन निरूपणकारांचा सत्कार करण्यात आला.
संकलन: गणपतराव सुतार

Post a Comment
0 Comments