*दयानंद मठपती यांची आयडॉल शिक्षक* म्हणून निवड
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, लातूर यांनी
विध्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विध्यार्थी विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांनाशिक्षकांना, विध्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी व शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने *आयडॉल शिक्षक* निवडलेले आहेत.
*श्री दयानंद मठपती* यांची *आयडॉल शिक्षक* म्हणून निवड झाल्याबद्दल निलंगा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री संतोष स्वामी, विस्तार अधिकारी श्री गणेश दाडगे, औरादचे केंद्र प्रमुख श्री डी. बी. गुंडूरे, केंद्रीय मुख्याध्यापक श्री सिद्राम चिल्लाळे,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री अरुण सोळुंके, सरचिटणीस श्री चंद्रकांत भोजने, तालुकाध्यक्ष श्री संजयदादा कदम, श्री गणेश गायकवाड, विषय साधन व्यक्ती श्री सचिन डोईजोडे, श्री प्रवीण डोईजोडे, श्री अतुल देशमुख, श्री माधव हालकरे, अशोक सुरवसे, गौतम कांबळे, श्री ज्ञानेश्वर सोनकांबळे, श्री गोरख म्हेत्रे व श्री प्रशांत मरगणे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments