Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश*


*श्री शिवाजी विद्यालयाच्या
विद्यार्थ्यांचे ‘एनएमएमएस’  परीक्षेत घवघवीत यश*

लातूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत सरस्वती काॅलनी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 31विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 10 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र व  7 विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
समर्थ परमदास सोनटक्के हा विद्यार्थी 120 गुण मिळवत विद्यालयात प्रथम, ओमकार चंद्रशेखर गोरे व ओमकार विकास शिंदे 113 गुण मिळवत द्वितीय तर सृष्टी श्रीराम शिंदे ही 108 गुण मिळवून विद्यालयात तृतीय आली आहे. या परीक्षेत शुभम नारायण वरवटे याने 106 गुण, स्वराज काशीनाथ फपाळ 99 गुण, तर राधिका संभाजी देवकत्ते, ओमराजे दिपक चव्हाण व अरमान अफसर पठाण यांना प्रत्येकी 98 गुण तर सोहम हनुमान धनवडे  97 गुण मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. तसेच आदित्य राऊत , श्रवण रेड्डी,  रोहन भोसले, कृष्णा दुबळे,आरती शेकडे , निलेश जाधव,  क्रांती देशमुख,  समर्थ मगर , राधिका सोमुसे,  सलोनी देवकत्ते , हर्षदा भडंगे , आदिनाथ शिंदे , श्रीराम कुंभार , श्रुती शिंदे , प्रणव भडंगे,  सृष्टी माने , आर्यन गपाट , आर्यन कोळेकर , इशिता हासुरे ,भक्ती गोरे आदींनी यश संपादन केले.
 या विद्यार्थ्यांना सुर्यवंशी सुर्यकांत, भोपे वसंत, सौ.रणक्षेत्रे एस. टी. , सौ घाडगे के एस,सौ पटेल आर. एन , सौ सरवदे व्ही. बी, सौ.काळे जे. बी , पाटे डी. एन,  देवणे एन.डी यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ नरेंद्र पाटील, कार्यकारी संचालक प्रा शेषराव मोहिते पाटील.संस्थेच्या संचालिका मेघाताई जाधव,  प्राचार्य तथा मुख्याध्यापक ज्योत्स्ना पाटील,उपप्राचार्य दयानंद देवणे, उपमुख्याध्यापक बालाजी गुरमे , प्रशासकीय अधिकारी अशोक तोगरे , पर्यवेक्षक सविता झिरमिरे, पर्यवेक्षक वसंत भोपे, प्रवीण घोरपडे , उमाकांत जाधव आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments