Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन*

 शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन



लातूर प्रतिनिधी : २३ मार्च :

 उन्हाळी पिकाची अवस्था आणि पाण्याची होत असलेली अडचण पाहता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मांजरा कालव्यातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी केली होती. या मागणी प्रमाणे राज्याचे वैदयकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प कालवा समिती बैठकीत मांजरा धरणातुन पाणी सोडण्यात बाबत निर्देश दिले होते. मांजरा धरणातील कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत. दरम्यान मांजरा धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  यावर्षी पावसाळयात सुरूवातील अत्यल्प पाऊस्‍ तर परतीचा पाऊस तेवढ चांगला झाला आहे. पावसाच्या अनियमीततेमुळे पाणी पातळी मात्र वाढली नाही. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने परिणामी सध्या नदी, तलाव, विहीरी तसेच ट्युबवेलची पाणी पातळी कमी झाली आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. मांजरा धरणातून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत होती. याअनुषंगाने  शेतकऱ्यांनी आमदर धीरज देशमुख यांची भेट घेऊन् मांजरा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली. आमदार धीरज देशमुख यांनी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क करुन मांजरा धरणातून तातडीने पाणी सोडण्याचे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन त्वरीत पाणी सोडण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती.

  शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून आमदार धीरज देशमुख यांनी पाठपुरावा केला. यानंतर पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प कालवा समिती बैठकीत निर्देश दिल्या प्रमाणे मांजरा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यावदारे २२ मार्चपासून पाणी सोडण्यात आले आहे. आज रोजी ३० ते ३५ किमी पर्यंत पाणी पोहचले आहे. ऊन्हाळी पिकासाठी मांजरा धरणातून पाणी सुटल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण असून पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख व आमदार धीरज देशमुख यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments