सभासद हित-हेच आमचं ध्येय
डी.सी.पी.एस.धारकां च्या वारसास दोन लाखांचा सानुगह विमा - चेअरमन अरुण सोळूंके...
निलंगा:—(प्रतिनिधी) जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. निलंगा यांची ४३ वी सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली.पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळूंके यांनी 'सभासदांचे हित' हेच आमचं ब्रीद असून सभासदांच्या हिताचेच निर्णय मागील चार वर्षात घेतलेले आहेत व भविष्यातही सभासदांची हितासाठी विद्यमान संचालक मंडळ काम करेल याचा विश्वास दिला.डी.सी.पी.एस.शिक्षक सभासदांसाठी दोन लाख रुपयाचा विमा चेअरमन अरुण सोळूंके यांनी जाहिर केला.
जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्था मर्या. निलंगा यांची ४३ वी सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची) निलंगा येथे आज आयोजित करण्यात आली होती.दोन सञात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.निलंगा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी संतोष स्वामी हे प्रथम सञाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळूंके,निलंगा तालुक्याच्या सभापती राधाताई बिराजदार,उप सभापती अंजलीताई बोंडगे (पाटील), दगडू सोळूंके,किशनराव बिराजदार,सुरेशराव बिराजदार,राजा पाटील व मार्गदर्शक म्हणून शिक्षक नेते शिवाजीराव साखरे (वाघ) व जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव गोविंदपूरकर हे उपस्थित होते.
क्रांतीज्योती साविञीमाई फुले व स्व. शिवाजीराव पाटील,निलंगेकर (दादासाहेब) यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दिप प्रज्वलन करुन सर्वसाधारण सभेचे उद्घाटन करण्यात आले. स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर व मयत सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. निलंगा पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळूंके यांनी सभेचे प्रास्तविक केले.आपल्या प्रास्तविकात त्यांनी मागील १७ वर्षाच्या संचालक मंडळाच्या कामकाजावर प्रहार केला.मागील संचालकांनी थकबाकीच्या रुपाने पतसंस्था डबघाईस आणल्याचे सांगितले.२०१६ सालापासून आपल्या संचालक मंडळाने थकबाकीत असलेली पतसंस्था नफ्यात आणली,सभासद बांधव लांभांष विसरले होते.विक्रमी ६% लाभांष दिले.कर्ज मर्यादा ४.८० लाखाहून १२ लाख रुपये करण्यात आली असून 'आज अर्ज,उद्या कर्ज' इतकी प्रगती विद्यमान संचालक मंडळाने केली आहे.संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार पाहून सभासदांनी जवळपास एक कोटी रुपयाच्या ठेवी ठेवल्या आहेत,हे सांगायला चेअरमन अरुन सोळूंके विसरले नाहीत.पतसंस्थेची पुढील दिशा सांगतांना,व्याज दर नक्कीच कमी करण्यात येईल व डी.सी.पी.एस.सभासदांना २ लाखाचा विमा दिला जाईल याचा विश्वास दिला.पतसंस्थेचे सचिव केशव गंभीरे यांनीही 'विद्यमान संचालक' मंडळाने केलेल्या उल्लेखनीय कामाची यादीच वाचून दाखविली व भविष्य काळातील आपली भूमिका स्पष्ट केली.सभासद हितासाठी सर्वांनी मिळून काम करु या,असे आवाहन विरोधकांना केले.सहकारातील जाणकार अभ्यासू व्यक्तीमत्व अशोकराव गोविंदपूरकर यांनी अनमोल मार्गदर्शन केले.शिवाजीराव साखरे (वाघ) यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभाराबद्दल अभिनंदन करुन 'फक्त सभासद हित ध्यानात ठेवावे' असे आवाहन केले.जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळूंके यांनी आपल्या खास 'कानडी' शैलीमध्ये मनोगत व्यक्त केले.दगडूजीराव सोळूंके व किशनराव बिरादार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सर्वसाधारण सभेचे सूञसंचालन संचालक दयानंद मठपती यांनी केले तर आभार संचालक संजय कदम यांनी मानले.कोरोनाच्या या भयानक संकटामुळे शासन निर्देशानुसार ५० जणांनाच सभेमध्ये परवानगी देण्यात आली होती.राहिलेले सर्व सभासद Zoom,Google Meet व युट्यूब वरुन Online उपस्थित होते. पतसंस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच Online सर्वसाधारण सभा घेण्यात आली.दुस-या प्रश्नोत्तराच्या सञामध्ये विरोधकांना काय प्रश्न विचारावा याचा प्रश्न पडला होता.एकंदरीत जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.पतसंस्थेचे उपाध्यक्ष धर्मप्रकाश लखने,संचालक संजय कदम,दयानंद मठपती,चंद्रकांत पाटील,सुनिता रोळे,दिपा माने,ज्ञानदेव गुंडूरे,ज्ञानदेव धुमाळ,संजय अंबुलगेकर व प्रकाश सराटे मंचावर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments