होळीला करणार ; महावितरणच्या बिलाची होळी...
माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा राज्य सरकारला इशारा....
निलंगा:-( प्रतिनिधी)
राज्य सरकार हे महावसूली सरकार आहे.नागरिकांकडून वीज बिलांची वसुली केली जात आहे.या वसुलीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे.त्याची सर्व फोटो सोशल मीडियावर पाठवून राज्य सरकारच्या नावाने बोंबाबोंब मारण्यात येईल,असा इशारा माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.
कोविड-१९ काळात अनेक महिने दुकाने व व्यवसाय बंद होते.त्यामुळे अनेकांची रोजीरोटी बंद पडली.माञ या काळातही महावितरणने वीजबिले दिली.भरमसाठ बिलांमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे.बिल भरणे शक्य नाही.केश कर्तनालयासारख्या दुकानदारांना लाखोंची बिले आली आहेत.काही ठिकाणी वीज जोडणी देण्यापूर्वीच वीज बिले पाठविली आहेत.यामुळे सामान्य नागरिक संकटात आहेत.त्यामुळे या सरकारच्या विरोधात २८ तारखेला होलिका पौर्णिमा आहे.त्या दिवशी सरकारच्या नावाने होळी केली जाणार असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रभरातील नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत घरातच हे आंदोलन करावे,असे आवाहनही आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
*गृहखात्यापेक्षा महावितरणमध्ये वसुली*
गृहखात्याच्या माध्यमातून महिन्याला १०० कोटी रूपयांचा वसुली करणारे हे सरकार आहे.त्याहीपेक्षा अधिक वसुली वीज खात्याच्या माध्यमातून सरकार करीत आहे.मागील अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे.यंदा पाणी उपलब्ध आहे.पण महावितरणने वीज तोडल्यामुळे पाणी देता येत नाही.या सरकारला शेतकर्यांशी काही देणेघेणे नाही,असा आरोपही आ.निलंगेकर यांनी केला.
२८ तारखेला होलिका पौर्णिमा आहे.त्या दिवशी या सरकारच्या नावाने वीज बिलांची होळी केली जाणार आहे.या वीज बिलांच्या होळीचे फोटो पाठवावेत.यासाठी ' महावसुली सरकार ' हा हॅशटॅग वापरावा.होळीमध्ये बिलांचे दहन करताना सरकारच्या नावाने बोंबाबोंब मारावी.होळीची धग मुंबईत बसलेल्या सरकारला पोहोचली पाहिजे.मारलेली बोंब सरकारच्या कानात घुमली पाहिजे,असेही माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर याप्रसंगी म्हणाले.


Post a Comment
0 Comments