Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

*गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा- आक्रमक !*


*गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा- आक्रमक !*








निलंगा :-( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यात ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या भ्रष्ट- कारभाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. निलंगा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी पालकमंत्री तथा आमदार श्री. संभाजी भैय्या पाटील निलंगेकर व श्री. अरविंदभैय्या पाटील निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत- घोषणाबाजीही व निदर्शने करण्यात आली. मुंबई पोलिसाचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांच्या पत्र "खुलाश्याने" गृहमंत्र्यांनी पोलिसांना (दरमहा- १०० कोटी) वसुल करण्यासाठी टार्गेट दिलेले असल्याचे सांगितले. तसेच अंबानी जिलेटीन प्रकरण, मनसूख हिरेन, आत्महत्येची सरकारची संशयास्पद भुमिका कोरोना काळातील ढासळलेली (आरोग्य- यंत्रणा) व (कोव्हीड- सेंटरच्या) नावाखाली झालेला भ्रष्टाचार, (एमपीएससीच्या) परिक्षे- बाबतचा, नियोजन- शून्य कारभार सरकारमधील मंत्र्यांचे अनैतिक- संबंध त्यातूनच, घडलेल्या हत्या-आत्महत्या विकासकामांना बसलेली खिळ या सर्व- कारणांमुळे सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन, जनतेच्या लोकशाहीचा व्यवस्थेवरचा विश्वासघात होत चाललेला आहे. त्यामुळे, अशा सरकारचा निलंगा येथे भाजपच्या वतीने जाहीर निषेध"! करत गृहमंत्री श्री. Anil Deshmukh व मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, आपल्या पदांचा राजीनामा द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे- तहसीलदार साहेबांना करण्यात आली.

    त्याप्रसंगी, भाजपा संघटन-मंत्री श्री. संजय दोरवे, जिल्हाउपाध्यक्ष श्री.शेषेराव मेमाळे, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.शाहुराज थेटे, भाजपा अध्यात्मिक मराठवाडा संयोजक श्री. ज्ञानेश्वर बरमदे, भाजपा शहराध्यक्ष श्री. विरभद्र स्वामी, भाऊसाहेब जाधव, किशोर जाधव, माधव पटणे, युवराज पवार, प्रकाश पटणे, रियाज सौदागर, संजय हलगरकर, नागेंद्र पाटील, सचिन गायकवाड, मनोज पवार, नामदेव काळे आदी सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments