*शेतकऱ्यांची मागणी व त्यांसंदर्भातील आमदार धीरज देशमुख यांचा पाठपुरावा लक्षात घेऊन२२ मार्चपासून मांजरा धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश*.
लातूर २१ मार्च :
शेतकऱ्यांची मागणी आणि त्यासंदर्भाने आमदार धीरज देशमुख यांनी केलेला पाठपुरावा यामुळे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मांजरा धरणातून २२ मार्चपासून पाणी सोडण्याचे निर्देश दिले असून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही जलसंपदा विभागाला दिले आहेत.
मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्प कालवा समितीची बैठक नुकतीच पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. यावेळी शेतकऱ्यांची मागणी नोंदवून त्याप्रमाणे कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन करावे असे पालकमंत्री देशमुख यांनी निर्देश दिले होते. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून नदी, तलाव, विहीरी तसेच ट्युबवेलची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळी पिकासाठी मांजरा धरणातून लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भाने अनेक शेतकऱ्यांनी आमदर धीरज देशमुख यांची भेंट घेऊन् सद्यस्थितीची जाणीव करून देत मांजरा धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. आमदार धीरज देशमुख यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क करुन मांजरा धरणातून तातडीने पाणी सोडण्याचे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन त्वरीत पाणी सोडण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली होती.
शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी आणी आमदार धीरज देशमुख यांच्याकडून यासंदर्भाने होणारा पाठपुरावा लक्षात घेता पालकमंत्री नामदार अमित देशमुख यांनी २२ मार्च पासून मांजरा धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत, त्याचबरोबर धरणातून सोडलेल्या पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच सदरील पाणी काटकसरीने वापरेल जाईल याची दक्षता जलसंपदा विभागाने घ्यावी असे निर्देशही पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.


Post a Comment
0 Comments