*तांबाळा जि.प.शाळेत 'जागतिक जल दिन' साजरा
*
निलंगा( प्रतिनिधी) जि.प.प्रा.शा.तांबाळा ता.निलंगा येथे आज जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमृत तुमकुटे,शाळेतील सह शिक्षक लक्ष्मण चापाले,नामदेव चोले व मुख्याध्यापक दयानंद मठपती,पिरुपटेलवाडीचे मुख्याध्यापक राजे के.के.,डाँ. संतोष डाळींबे व बांधकामावरील कामगार,शालेय पोषण आहार मदतनीस सुनिता ब्रम्हावाले यांनी जल दिनानिमीत्त 'जल बचतीची प्रतिज्ञा घेतली.जल है तो कल है,पाणी वाचवा-जीवन वाचवा,जल ही जीवन है, हा संदेश जनमाणसांत रुजविण्याचा त्यांनी संकल्प केला.जागतिक जल दिन हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा केला जातो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्ञोतांची काळजी घेणे,त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


Post a Comment
0 Comments