*तांबाळा येथे जागतिक वन दिन साजरा*
निलंगा (प्रतिनिधी) जिल्ह्यातील निलंगा तालुक्याच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या तांबाळा गावात २१ मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.पर्यावरणात समतोल राखण्यासाठी झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.वृक्ष असतील तरच आपणास प्राणवायू मिळणार आहे,वृक्ष आहेत म्हणून जीवमाञा जिवंत आहे.या वृक्षाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी २१ मार्चला 'जागतिक वन दिन' साजरा केला जातो. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून वन विभाग वि.का.लातूर,बीट औराद शहाजानी यांच्यावतीने तांबाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले.वनरक्षक परसेवाड एस.बी.यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी तांबाळ्याचे उप सरपंच बस्वराज पाटील,वनरक्षक परसेवाड एस.बी.,वन मजूर पुंडलिक बिरादार,सुभाष तांबाळे ,गावातील काही प्रतिष्ठित मंडळी व रोपवाटिकेतील मजूर उपस्थित होते.'झाडे लावा-झाडे जगवा' हा संदेश मनामनांत पोहचला पाहिजे व प्रत्येकानी पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी एक तरी झाड जगवावे. आवाहन वनरक्षक परसेवाड एस.बी यांनी केले.याप्रसंगी तांबाळा गावचे उप सरपंच बस्वराज पाटील यांनी उपस्थितांना मास्क पुरविले.


Post a Comment
0 Comments