*फिरता दवाखाना लोकार्पण सोहळा संपन्न*
लातूर (प्रतिनिधी) - दिशा प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिशा प्रतिष्ठान चा मानवीय उपक्रम माननीय जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण सोहळा संपन्न...
शैक्षणिक क्षेत्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठानने मागील एक वर्षांमध्ये 37 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच रोजगार क्षेत्रातही अनेक गरजू तरुणांना प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांना नेहमीच मदतीचा हात देऊन त्यांना सहकार्य केले याचेच अजून एक पुढचे पाऊल म्हणून ग्रामीण वैद्यकीय समस्येचा विचार करून दिशा प्रतिष्ठानने फिरता दवाखाना चालू केला आहे.
स्व.श्री.रेवणसिद्ध माकणे यांच्या स्मरणार्थ माकणे परिवारातील सदस्यांनी ही गाडी दिशा प्रतिष्ठान साठी उपलब्ध करून दिली. या उपक्रमा मार्फत ग्रामीण गरजू रुग्णांना योग्य व जागेवर रोगाचे निदान करेल व आवश्यकता असल्यास त्यांना शहरातील वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करेल.
लातूर जिल्ह्यातील दहा गावांची यासाठी निवड झालेली आहे व प्रत्येक आठवडी बाजाराच्या दिवशी ही सेवा नियोजित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल....याप्रसंगी मार्गदर्शक अभिजित देशमुख, डॉ अशोक पोद्दार, प्रसाद उदगीरकर, डॉ चेतन सारडा, किशोर भुजबळ, प्रसाद जोशी, अविनाश कामदार, रतन बिदादा. अध्यक्ष सोनू डगवाले, उपाध्यक्ष दिनेश गोजमगुंडे, सचिव जब्बार पठाण, प्रकल्प समन्वयक वैशाली यादव, कोषाध्यक्ष अजय शाह, सदस्य इसरार सगरे, विष्णू धायगुडे. विभीषण घोलप उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments