*विलास कारखान्याच्या वतीने पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपन, रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन*
लातूर २१ मार्च :
विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत रविवार दि. २१ मार्च २०२१ रोजी वृक्षारोपन करण्यात आले, रक्तदान शिबीर घेण्यात आले आणि मातोश्री वृध्दाश्रम येथे जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.
विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख व सर्व संचालकांच्या उपस्थितीत प्रारंभी वृक्षरोपन कार्यक्रमाअंतर्गत इंधनासाठी उपयुक्त वृक्षाची लागवड करण्यात आली.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सदयाच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेता यावा, या करीता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात १२१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या सर्वांचे चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले.
ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधून लातूर येथील मातोश्री
वृध्दाश्रम येथे जिवनउपयोगी साहित्य तसेच कोवीड१९ काळात मदत व्हावी म्हणून मास्क, सॅनीटायझर देण्यात आले.
या वाढदिवसानिमीत्तच्या आयोजित कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक जे.एस.मोहिते, संचालक गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अनिल पाटील, रजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, सौ. कुसुमताई कदम, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर यांच्यासह कारखाना सभासद, शेतकरी, ऊस तोडणी ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कामगार उपस्थित होते.
-----------------------------




Post a Comment
0 Comments