प्रा. बस्वराज पाटील महाराष्ट्र सेट परीक्षा उत्तीर्ण
.
*प्रा.बस्वराज पाटील समाजशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण*
लातूर :-( प्रतिनिधी) ज्ञानज्योती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष , ज्ञानज्योती बाल संस्कार केंद्र लातूर चे संचालक , माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे लातूर शहर अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक समीक्षक प्रा.बस्वराज पाटील समाजशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे. त्या बद्दल लातूर मित्र परिवारातर्फे, आम्ही तगरखेडकर ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
युजीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २७डिसेंबर २०२०रोजी सहायक प्राध्यापक राज्य पात्रता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे.प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. समाजशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल प्रा.बस्वराज पाटील यांचे सरपंच, उपसरपंच मदन बिरादार , मा.सरपंच प्रकाश स्वामी, रमेश थेटे,भाजप तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, पत्रकार बालाजी थेटे,संग्राम टेकले ,संतोष मुळजे,मधुकर पाटील ,पवन थेटे, अशपाक मातीशे ,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे जिल्हाध्यक्ष शिवाजी निरमनाळे, तालुकाध्यक्ष दयानंद मठपती इ. अभिनंदन करून पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



Post a Comment
0 Comments