*निलंगा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा 'तुरा'*
*राज्यस्तरीय पुस्तकात तांबाळा शाळेचा फोटो 'मुख पृष्ठावर'*
लातूर :-( प्रतिनिधी)
समग्र शिक्षा-महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्यावतीने 'शालेय पायाभूत सुविधा' नावाची मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली असून शाळेत कोणकोणत्या सुविधा असाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.या पुस्तिकेच्या 'मुख पृष्ठावर' निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा फोटो छापण्यात आला आहे.व पुस्तिकेच्या आतील पानावर एक फोटो छापण्यात आला आहे.ही सर्व निलंगेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.निलंगा तालुक्याच्या सभापती राधाताई बिराजदार,उप सभापती अंजलीताई बोंडगे,सर्व पं.स.सदस्य,गट विकास अधिकारी अमोल ताकभाते साहेब,गट शिक्षणाधिकारी संतोष स्वामी साहेब,सर्व केंद्र प्रमुख,सर्व साधन व्यक्ती,शाळा व्यवस्थापन समिती,गावातील दानशूर व्यक्ती व शिक्षक बांधवांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे.या सर्वांचे मनापासून अभिनंदन मुख्याध्यापक दयानंद मठपती यांनी केले.ही पुस्तिका महाराष्ट्रातील सर्व शाळांना वितरीत करण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments