*ग्रामसेवकांची बदली करा अन्यथा आमरण उपोषण*
लातूर :-( प्रतिनिधी)
रेणापूर काँग्रेस सेवादलाचे सचिव ओमप्रकाश सोमवंशी व चाडगाव युवक काँग्रेसचे अध्यक्ष केशव माने यांनी चाडगावातील ग्रामसेवकांची बदली करा अन्यथा आमरण उपोषणाला बसू असे निवेदन दि. १९ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या कडे देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथे सहा ते सात वर्षांपासून लालासाहेब पुजारी हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. एकाच ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून असल्याने गावातील नागरिकांना सौजन्याची वागणूक देत नाहीत.गावात राजकारण करत आहेत. अरेरावीची भाषा वापरतात.तसेच गावातील नरेगा विभागाकडून रस्त्यांची कामेचालू आहेत. संबंधित शेत रस्ते शेतकऱ्यांना न विचारता केले जातात ग्रामपंचायत ठराव शेतकऱ्यांना न विचारता व शेतकऱ्यांची संमती न घेता केली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत या संदर्भात गावातील नानासाहेब माने केशव माने व इतर ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली आहेत. परंतु संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी व बऱ्याच वर्षांनी ग्रामसेवक गावात नोकरी करत असल्याने गावात शांतता पसरत आहे. तसेच चौदाव्या वित्त आयोगातील विकास कामाची चौकशी करावी ग्रामसेवकाची बदली करावी. बदली न केल्यास 25 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता काँग्रेस सेवा दलाच्या वतीनेअमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन काँग्रेस सेवादलाचे सचिव ओमप्रकाश सोमवंशी यांनी निवासी जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.

Post a Comment
0 Comments